प्रकाशनाबद्दल

गेल्या ४३ वर्षांहून अधिक काळापासून मधुश्री प्रकाशन उत्तमोत्तम साहित्त्य पुस्तकरूपात रसिक वाचकांपुढे सादर करीत आहे. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरीलही उदयोन्मुख कवी, लेखक, नाट्ककार यांचे दर्जेदार साहित्यास मोठ्या संख्येनं वाचक मिळवून देण्याचा वसाच प्रकाशनाने घेतलेला आहे. एकापेक्षा एक सरस कादंबर्‍या, कथासंग्रह, चरित्रे, प्रवासवर्णने, धार्मिक साहित्याचे प्रकाशन मधुश्री प्रकाशनाने केले आहे व करीत आहे.
वितरणाच्या सुसज्ज यंत्रणेद्वारे मधुश्रीने प्रकाशित केलेले प्रत्येक पुस्तक महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपर्‍यातील वाचनालयात उपलब्ध असते.
प्रतिथयश लेखकांच्या पुस्तक प्रकाशनाबरोबरच नवोदित परंतु प्रतिभावान लेखक/कवींना प्रोत्साहन देण्यातही मधुश्री प्रकाशनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. हे संस्थळ (website) त्याचाच एक महत्वाचा भाग आहे.
या प्रतिभावान लेखक लेखिकांना महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात वाचक मिळवून देत असतानाच त्यांच्या साहित्याचे महाराष्ट्राबाहेरही नाव व्हावे, त्यांच्या साहित्यकृतीला प्रोत्साहन मिळावे याच उद्देशाने ह्या संस्थळाची आम्ही सुरुवात केली आहे.

आमच्या या संस्थळावर तुम्ही आमच्या २००९ सालच्या व त्यापुढील पुस्तकांचा आढावा घेऊ शकाल. पुस्तकाचे मुखपृष्ठ, त्याचे लेखक/ लेखिका, प्रकार, पुस्तकाचा सारांश असे सर्व तुम्हाला इथे पहाता येईलच पण त्याच बरोबर तुम्हाला पुस्तकाचे वाचन झाल्यानंतर त्यावर मतही नोंदवता येईल.
आगामी पुस्तकांच्या यादीत आमची पुढील काही महिन्यांत प्रकाशित होणारी पुस्तकेही तुम्ही पाहू शकता.

***

***