अपरिचित महाभारत

320.00

महाभारत हे अरण्यासारखे आहे.

तिथे महावृक्ष आहेत, झाडेझुडपेही आहेत खूप.

पण काही आडवाटांवर फुललेली अनवट वासाची, सहजी न दिसणारी चिमुकली रानफुलेही आहेत.

वासंती देशपांडे यांनी या पुस्तकात अशीच काही रानफुले आणली आहेत.

एखाद्या राजवाड्याच्या प्रचंड सजवलेल्या आणि अनेक झुंबरांनी उजळलेल्या दिवाणखाण्यातही काही अंधारे कोपरे असतात. या पुस्तकातील व्यक्तिचित्रे अशाच अंधारातल्या परंतु देखण्या, सुंदर कोपर्‍यांसारखी आहेत.

महाभारताचे अतिशय बारकाईने आणि मर्मद्यपणे केलेले वाचन आणि त्यावरचे प्रातिभ चिंतन यातून काहीशा दुर्लक्षित पात्रांच्या व्यक्तिचित्रांचा हा वाचनीय ग्रंथ निर्माण झाला आहे.

अगदी आवर्जून वाचायला हवा असा!

– संजय भास्कर जोशी
(प्रसिद्ध लेखक, आस्वादक आणि समीक्षक)

Description

(aparichit mahabharat)

You may also like…