नवश्या गणपती

450.00

(Navshya Ganapati)
(विज्ञान कथासंग्रह)

ले. शरद पुराणिक
~~

अफाट कल्पनाशक्ती व भविष्यातील घटनांचे विज्ञानाधिष्ठीत आकलन यांची उत्तम सांगड म्हणजे ‘नवश्या गणपती’ हा विज्ञान कथासंग्रह! भविष्यातील विज्ञान रंजनाबरोबरच पौराणिक, ऐतिहासिक दाखल्यांचा उल्लेख, रहस्यमय वर्णन, ग्रामीण बाजाच्या कथांमध्ये वापरलेली ग्रामीण अहिराणी भाषा, प्रसंगी विनोदी शैलीत केलेले समाजप्रबोधन असा हा सर्व निकषांवर परिपुष्ट मराठी विज्ञान कथासंग्रह वाचकांना खिळवून ठेवण्यात नि:संशय यशस्वी होईल.
– सौ. रोहिणी कुलकर्णी, ठाणे

Description

“हे नवश्या गणपती मंदिर किनई, राघोबादादा आणि आनंदीबाई यांनी बांधलंय. फार जागृत देवस्थान आहे. आपली इच्छा इथे मनातल्या मनात व्यक्त केली तरी ती नक्कीच पूर्ण होते.” कमळी मला म्हणाली.

सर्वत्र अंधार होता. कुठे चिटपाखरूही दिसत नव्हतं. रस्त्यावरचे विजेचे दिवे पिवळा प्रकाश ओतत होते, पण अंधाराचं साम्राज्य त्यांना जुमानत नव्हतं. सतत चिवचिवणारी कमी गप्प गप्प होती. आमचे हात एकमेकांच्या पाठीभोवती लपेटलेले होते. कमीच्या शरीराची घाबरल्यामुळे होणारी थरथर जाणवत होती. मी सुद्धा घाबरलो होतो.

त्या छोट्याश्या रस्त्याच्या अरुंद कडेला आम्ही भिंतीला पाठ चिकटवून उभे राहिलो.

अचानक हातात मशाली घेतलेले चार जण आमच्या समोर अवतीर्ण झाले. आमच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांचा वेश इतिहासकालीन मावळ्यांसारखा होता. कमरेला तलवार लटकलेली होती. त्यांच्या मागे एक गोरंपान जोडपं, त्या जोडप्याच्या मागे दोन पावलांवर तबक हातात घेतलेली एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या मागे आणखी चार मशालधारी होते.

आमची पाचावर धारण बसली होती…

~~