Sale!

आठवण तुझीच!

150.00

(Aathvan Tuzich)

ले. सुभा लोंढे

`आठवण तुझीच` ही कहाणी आहे अकाली निधन पावलेल्या आप्पा ऊर्फ अतुल, या तरुणाची; त्याच्या मातेनं लिहिलेली!

पण एका मातेच्या आठवणी इतकंच या लेखनाचं स्वरूप नाही. इथे आपल्याला भेटतो एक असा तरुण, जो सुरुवातीला अभ्यासात, शिक्षणात आलेल्या अपयशाने खचून न जाता या अपयशास यशाची पहिली पायरी समजतो. कुटुंबाची गरज म्हणून तो प्रवासी वाहतूक करणारा चालक म्हणून अगदी मनापासून व्यवसाय सुरू करतो. आपल्या मनमिळाऊ, विनम्र स्वभावामुळे जवळपासच्या गावातील लोकांचा लाडका होतो. वेळोवेळी लोकांच्या अडचणीला उभा राहत असतानाच स्वत:वर आलेल्या अनेक संकटांचाही अगदी धाडसाने सामना करतो.

चार वर्षे शिक्षणापासून दूर राहिलेला आप्पा संधी मिळताच आपले शिक्षण पुन्हा सुरू करतो आणि आपल्या स्वभावामुळे, हरहुन्नरीपणामुळे महाविद्यालयातील प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत मित्र-मैत्रिणींबरोबरच प्राध्यापकांचाही लाडका होतो.

ग्रामीण भागातील एका तरुणाने, आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी दिलेला हा लढा आजच्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी असाच आहे..

**

You may also like…