एक वेगळी सी. जे. पी.
₹430.00
(Ek Vegli CJP)
अनिल अभ्यंकर
उत्तम लेखक- आजूबाजूच्या समाजात घडणाऱ्या घटना, प्रसंग व अनुभव यातून सतत आपल्या लेखनासाठी नवनवीन विषय आणि कल्पना मिळवत असतो, आणि आपल्या स्वत:च्या कल्पनाशक्तीने या बीजास उत्तम कथारूपात बहरास आणू शकतो.
‘एक वेगळी सी. जे. पी.’ हा अनिल अभ्यंकर यांचा विनोदी कथासंग्रह असला, तरी केवळ हसवणूक हा या संग्रहाचा एकमेव उद्देश नाही. दैनंदिन जीवनातील प्रसंग, माणसांचे स्वभाव, नातेसंबंध, सामाजिक विसंगती, बदलती मानसिकता, व्यवहारातील विरोधाभास आणि जगण्यातले छोटे-मोठे पेच यांकडे लेखक विनोदाच्या नजरेतून पाहतो; पण त्या हास्यामागे एखादा विचार, एखादी विसंगती किंवा एखादी बोचरी जाणीवही वाचकाच्या अगदी सहज लक्षात येते.
सामान्य वाटणाऱ्या घटनांमध्ये असामान्य विनोद शोधण्याची आणि त्या विनोदातून जीवनातील विसंगती दाखवण्याची लेखकाची हातोटी येथे लक्षात येते.
श्री. अभ्यंकर सातत्याने विविध नामवंत दिवाळी अंकांसाठी लेखन करत आहेत. ‘एक वेगळी सी. जे. पी.’ हा वाचकाला हलकेफुलके मनोरंजन देतानाच जगण्याकडे थोडे वेगळ्या नजरेने पाहायला लावणारा कथासंग्रह आहे. लेखकाने गंभीर सामाजिक विषयांना विनोदाच्या माध्यमातून मांडण्याचा मार्ग स्वीकारला आहे, जो आजच्या ताण-तणावाच्या काळात अतिशय सुखद वाटतो…
– पराग रघुनाथ लोणकर
(लेखक व प्रमुख कार्यवाह- अ. भा. मराठी प्रकाशक संघ)




