सांजतरंग
₹100.00
(Sanj Tarang)
– काव्य –
माणिक कौलगुड
माणिक कौलगुड यांचं एस.एस.सी. ते बी.ए.पर्यंतचं शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम काॅलेज, आताच्या शिवाजी विद्यापीठातून झाले. विवाहानंतर ४ वर्षे बर्लिन, जर्मनी, तर नंतर २८ वर्षे नागपूर येथे वास्तव्य होते. पती डाॅ. एम्. व्ही. कौलगुड हे नागपूर विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्रोफेसर व रिसर्च गाईड होते.
माणिक कौलगुड यांना पहिल्यापासूनच भारतीय शास्त्रीय संगीत व साहित्याची आवड होती. १९९५ पासून त्यांचे पुण्यात वास्तव्य आहे.
वयाच्या ८०व्या वर्षी नंतर त्यांनी कविता लिहायला सुरवात केली. अमरावती विद्यापीठातर्फे चाललेल्या चाललेल्या संस्कृत प्रचार अभियानांतर्गत मेघदूत, नीतीशतकम्, शाकुंतल, स्वप्नवासवदत्ता, अवधूत यदू संवाद आणि रघुवंश या ग्रंथांवर आधारित ऑनलाईन अभ्यासक्रम त्यांनी केले आहेत.
कौलगुड यांचा २०२४ साली ‘सांज सखी’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांचा हा ‘सांज तरंग’ काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे.




