गीतांजलीची काव्यांजली
₹200.00
(Geetnajalichi Kavyanjali)
कवयित्री: डॉ. गीतांजली शर्मा (कसमळकर)
‘गीतांजलीची काव्यांजली’च्या डॉक्टर गीतांजली शर्मा (कसमळकर) या गेली पंचवीस वर्ष नेत्रतज्ञ म्हणून पुण्यात कार्यरत आहेत. त्यांचाही हा दुसरा काव्यसंग्रह. डॉ. गीतांजली हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. दहावी शालांत परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात चौथ्या आलेल्या डॉ. गीतांजली अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या आहेत. गरीब रुग्णांसाठी मोफत नेत्रसेवेसारख्या विविध सामाजिक, समाजोपयोगी कामांमध्ये व साहित्यिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या कविता वाचकाला खूप काही देणाऱ्या आहेत. त्यांची प्रत्येक कविता वाचकाला विचारात पाडणारी आहे, स्वत: त्यावर चिंतन, विचार करायला लावणारी आहे.