गुगलचे डोके ठिकाणावर आहे का?

390.00

(Googleche doke thikanavar aahe kaa?)
ले. अविनाश चिंचवडकर
~
‘आनंदाचा ठेवा, आवर्जून वाचावा असा!’

सहज, साध्या, सोप्या आणि हलक्याफुलक्या विनोदानं मन प्रसन्न होतं. सकारात्मकता वाढते. ताण कमी होतो.

अलीकडच्या काळात, समकालीन विषयांवर लीलया विनोदी लिहिणारे असे एक महत्त्वाचे साहित्यिक म्हणजे श्री. अविनाशजी चिंचवडकर. मराठी भाषेतील विनोदी साहित्यात ते सातत्याने दर्जेदार भर घालत असतात. अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या विनोदी कथा-लेख प्रसिद्ध होत असतात.

‘गुगलचे डोके ठिकाणावर आहे का?’ या नव्या पुस्तकाच्या शीर्षकापासूनच वाचण्याची उत्सुकता वाढते. माध्यमक्रांती झाल्यापासून, माहिती तंत्रज्ञानाचं युग आलं. संगणक आणि मोबाईलमुळे जग आपल्या मुठीत आलं आहे. या माध्यमाचा वापर अपरिहार्य झाला आहे, पण कधी कधी त्याचा अतिरेक होतो. तारतम्य सुटतं आणि यातून अनेक विनोद घडतात. शोधक नजर, कल्पनाशक्ती आणि विनोदाची तंत्रं आणि मंत्र माहीत असतील तर यातून विनोदी साहित्य निर्माण करता येतं. ‘गुगलचे डोके ठिकाणावर आहे का?’ हे पुस्तक याचं उत्कृष्ट उदाहरण आहे.

हलकाफुलका विनोद फुलवणारा, हा संग्रह आहे. मोबाईलसारखं माध्यम वापरताना, तारतम्य सोडून काही मंडळी, आपापल्या लहरीनुसार किती आणि कसा अतिरेक करतात, याचा प्रत्यय, या पुस्तकाच्या पानोपानी येईल. ‘आपणही यात मोडतो का?’ असाही विचार मनात येऊन जाईल. आत्मपरीक्षणाची संधी मिळेल. ‘सदा फॉरवर्डकर’, ‘मी ग्रुप सोडतो त्याची गोष्ट’, ‘रिएलिटी शोज कसे जिंकावेत’, ‘चला-हवा जाऊ द्या’, ही लेखांची शीर्षकंच बोलकी आणि वेगळी आहेत. पुस्तकातील विविध विषयांवरचे विनोदी लेख अतिशय खुमासदार आहेत. वाचकांनी प्रत्यक्ष वाचून, त्यांचा आनंद घ्यायलाच हवा!

– बंडा जोशी, पुणे

You may also like…