जगद्गुरु संत तुकोबाराय यांचे विचारपुष्प

220.00

(Jagatguru sant Tukobaray yanche vicharpushpa)

ले. विनोद जाधव

“आज साडेतीनशे वर्षानंतरही जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या अभंगगाथेचे वर्चस्व कायम आहे. हजारो-लाखो कीर्तनकार, तत्वज्ञ, संशोधक, अभ्यासकांनी या ज्ञानगाथेचा विस्तार अजून वाढवला व वर्षोगंती अजूनही वाढतच राहील.

छोट्या-छोट्या अभंगरुपी नद्यांतून निर्माण होणारी ‘सकल तुकाराम गाथा’ हा ज्ञानसागर आहे. तुकोबांची सकल अभंग गाथा ही नावाप्रमाणेच कायम न भंगणारी, न आटणारी आहे. आज तुकोबांचे हजारो अभंग गायकांकडून ताला-सुरात गायले जात आहेत. कीर्तनकार दररोज प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशभरच नव्हे तर विदेशातही या अभंगांचे निरुपण करत आहेत. टीव्ही वाहिन्यांवरदेखील तुकोबांच्या अभंगांवर आधारीत भजन, कीर्तन, प्रवचने असे कार्यक्रम चालू असतात, कारण तुकोबांचे विचार, अभंग अन् त्यांची गाथा भूत, वर्तमान व भविष्याचा वेध घेणारी आहे.

येणाऱ्या काळातसुद्धा ‘अभंग तुकोबा’ प्रत्येकाच्या ओठी, हृदयी भक्ती, अध्यात्म अन् नितीमूल्यांचे शिक्षण देत राहणार आहेत.”

You may also like…