जसं सुचलं तसं!

220.00

`मोकळा संवाद साधणारं, संवेदनशील, पारदर्शी गद्य-पद्य लेखन!`
– कविता मेहेंदळे.

`प्रांजळ, मोकळ्या मनानं वाचकांशी थेट संवाद साधणारा, अगदी वेगळ्या प्रकारचा `स्वैर आत्मचिंतना`चा नजराणा!`
– राजीव बर्वे.

Description

(jasa suchala tasa!)
ले. पराग र. लोणकर

~~~~~~~~~~~~~~~~~~~

‘जसं सुचलं तसं` वाचताना अनेक विचार माझ्या मनातही येरझारा घालत होते.

या पुस्तकातील गद्यलेखन मनापासून झालेलं आहे. त्यातला प्रामाणिक भाव वाचताना जाणवतो. समजून घेणं, शब्दांचं मोल जाणणं आणि मोकळा संवाद साधण्याची वृत्ती पारदर्शीपणाने या लेखनात दिसते आहे. प्रत्येकालाच जगण्यासाठी काही प्रयोजन दिलेलं असतं. कधी ते उमगतं, तर कधी अंधारात असतं. परंतु लेखकास ते गवसलंय.

यातील कविताही खूप वेगळ्या, समरसून लिहिल्या गेल्यायत. विषयांमध्येही विविधता आहे. जीवनावरचं प्रेम, बांधिलकी आणि कर्म करीत राहण्याची असोशी त्यांमधून प्रत्ययाला येते.

मनातलं व्यक्त होण्यातली ही `कला` लेखकाचा हात कधीही सोडणार नाही, असा माझा ठाम विश्वास आहे…

– कविता मेहेंदळे

*

श्री. पराग लोणकर हे केवळ प्रकाशक नाहीत तर ते एक उत्तम लेखक आहेत. स्वत: उत्तम लेखन करणारे फार कमी प्रकाशक आहेत, त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे पराग लोणकर. त्यांच्या या सर्व व्यक्तित्वाचं दर्शन प्रस्तुत ‘जसं सुचलं तसं’ या पुस्तकातून पहायला मिळतं. कथा, कादंबरी, कविता, लेख अशा कोणत्याही किंवा एकाच वाङ्मय प्रकारात चपखल बसणारे हे पुस्तक नाही तर लेखकाचे हे ‘स्वैर आत्मचिंतन’ आहे.

इथे लेखक वाचकाशी अत्यंत थेट संवाद साधतो आणि ही पद्धत वेगळी, धक्कादायक असली तरी नाविन्यपूर्ण आहे. या पुस्तकातील प्रत्येक पानात दिसून येते ती लेखकाची प्रांजलता, सच्चेपणा आणि मोकळ्या मनाने केलेला संवाद!

प्रामाणिक मनाच्या, आडपडदा न ठेवता मोकळेपणाने लिहिलेल्या साहित्याचा, हा वेगळ्या प्रकारचा नजराणा वाचकांना निश्चितपणे आवडेल असा विश्वास वाटतो.

– राजीव बर्वे.

*

You may also like…