डॉ. आनंदीबाई जोशी: प्रवास एका ध्यासाचा!

580.00

(Doctor Aanandibai Joshi)

# डॉ. आनंदीबाई जोशी: प्रवास एका ध्यासाचा! #
(नंदिनी पटवर्धन यांच्या `Radical Spirits` या मूळ इंग्रजी पुस्तकाचा डॉ. श्रुती फाटक यांनी केलेला अनुवाद!)
**
आनंदीबाईंवरील आतापर्यंत प्रकाशित झालेली पुस्तकं ही आनंदीबाईंच्या चरित्राच्या इमारतीचा पाया आहेत. पण जसजसा काळ बदलतो तसतशी परिस्थिती बदलते. नवनवीन संशोधनपर तंत्रज्ञानाच्या शोधांनी बरीच नवीन माहिती उपलब्ध होते. आनंदीच्या आणि गोपाळरावांच्या अमेरिकेतील वास्तव्याबद्दल अशीच बरीच नवीन माहिती उपलब्ध झाली आहे. लेखिका नंदिनी पटवर्धन यांच्या चाळीस वर्षांहून अधिकच्या अमेरिकेतील वास्तव्यामुळे आनंदीच्या अमेरिकेतील वास्तव्यातील बारकावे त्यांना अधिक समजून घेता आले. एक व्यक्ती आणि एक स्त्री म्हणून आनंदीच्या भावभावनांचे या पुस्तकात उलगडलेले पदर मनोज्ञ आहेत. प्रत्येक घटनेमागे असलेले अनेक ज्ञात अज्ञात संदर्भ, परिश्रमपूर्ण संशोधन करूनच येथे मांडलेले आहेत.
१८७० ते १८९० हा काळ या पुस्तकात आपल्यापुढे अक्षरश: साकार झाला आहे.
**
मूळ पत्रं, विद्यापीठातील दस्तऐवज आणि इतर महत्वाच्या साधनांद्वारे केलेल्या संशोधनाच्या आधारे लिहिलेले हे पुस्तक डॉ. आनंदीच्या अद्भूत, तेजस्वी जीवनाबरोबरच ब्रिटिश इंडिया आणि यादवी युद्धोपरांत अमेरिका याचे एक तरल शब्दचित्र रेखाटते. या पुस्तकाचे वाचन हा निश्चितपणे एक समृद्ध करणारा आणि समाधान देणारा अनुभव आहे…
~~~~~

You may also like…