Sale!

तरंग अंतरंगीचे

150.00

(Tarang Antarangiche)

‘तरंग अंतरंगीचे’ हा तावून सुलाखून घेतलेला कुठलाही लेखन प्रकार नाही. पश्चिम रेल्वेच्या वलसाड (गुजरात) येथील इलेक्ट्रिक लोको शेड मधून मेंटेनन्स विभागातून सीनियर सेक्शन इंजिनिअर या पदावरून स्वेच्छानिवृत्त झाल्यानंतर आपलं बालपण ते स्वेच्छानिवृत्ती पर्यंतच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा विचार लेखकाच्या मनात आला. जीवनाच्या या संध्यासमयी डोळे मिटून शांतपणे बसल्यावर दृष्टिपटलावरून झरझर सरकणार्‍या या आठवणी आठवत गेल्या तशा शब्दबद्ध केल्याने कथन क्रम थोडाफार मागेपुढे होणे हे स्वाभाविकच!

लेखकाने विविध काळात निरनिराळ्या ठिकाणी केलेले वास्तव्य, तेथे आलेले कटुगोड अनुभव तसंच लेखकाचे नातेसंबंध या बाबतच्या आठवणी सहजसुंदर व ओघवत्या अशा लेखन शैलीत कथन केल्या आहेत. या आठवणी वाचतांना वाचकांना आपल्या स्वत:च्याही जीवनाचा पट स्मरणसाकार होऊन पुनःप्रत्ययी आनंदाचा हमखास लाभ होईल हे निश्चित!

– प्रकाशक

Description

ले. श्री. दत्तात्रेय पाठक

You may also like…