Sale!

दीपकळ्या स्मरणातल्या!

250.00

(Deepkalya Smaranatlya!)

(“मधुश्री (घरपोच) वाचनालय योजनेत सध्या समाविष्ट नाही!”)

ले. नलिनी कुलकर्णी

श्रीमती नलिनी कुलकर्णी या- किराणा घराण्याचे एक प्रतिथयश गायक असलेल्या आणि पं. भीमसेन जोशी, गानकोकिळा हिराबाई बडोदेकर यांना संवादिनी (हार्मोनियम)वर साथ करणाऱ्या- पं. विठ्ठलराव सरदेशमुख यांच्या कन्या!

बालपणात ज्यांच्या घरात पं. वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, माणिक वर्मा, पं. भीमसेन जोशी यांच्या मैफली रंगल्या, `सवाई गंधर्व महोत्सव` सुरु करण्याची कल्पना जन्मास आली, त्या लेखिकेच्या या आठवणी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. `वाऱ्यावरची वरात`च्या प्रयोगासाठी हार्मोनियम घेण्यास स्वत: पु.ल. देशपांडे आल्यानंतरचा संपूर्ण प्रसंग, लेखिकेच्या वडीलांच्या धडपडीने मुंबईहून पुण्यास आलेले तरुण कुमार गंधर्व आणि त्यांची सदाशिव पेठेतील एका जुन्या वाड्यात झालेली पहिली मैफल, माणिक वर्मा यांचे डोहाळजेवण, हे आणि असे अनेक किस्से मुळातून वाचण्यासारखे!

१९३६ साली लेखिकेच्या जन्मानंतरच्या आत्ता आत्तापर्यंतच्या त्यांच्या आठवणींबरोबरच त्यांच्या जन्माआधीच्या काळातील; त्यांनी आपल्या आई-वडिलांकडून जाणलेल्या अनेक घटना, अतिशय ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केल्यामुळे खूप मोठा काळ, त्या त्या काळातील समाज, चालीरीती, लेखिकेच्या संपर्कात आलेली लहान-थोर माणसे, या सगळ्यांचे अतिशय वाचनीय, माहितीपूर्ण व आपल्याला अगदी वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे हे शब्दचित्र एखादा चित्रपट पाहिल्याप्रमाणे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते!

श्रीमती नलिनी कुलकर्णी तीस वर्षे भाषा विषयाचे अध्यापन करून निवृत्त झालेल्या असून त्यांचे लेखन वसंतश्री, गार्गी, धनुर्धारी, ललना यांसारख्या नामवंत दिवाळी अंकांतून प्रकाशित होत असते. `गाथा एका विठ्ठलाची` हे त्यांचे पुस्तक वसंतश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. मुंबई आकाशवाणीवर `गंमत जंमत` या मालिकेचे त्यांनी सूत्रसंचालन केले असून `जागर` या हस्तलिखित दिवाळी अंकांचे लेखन-संपादनाचा त्यांचा उपक्रम गेली २१ वर्षे अव्याहत चालू आहे…
~~~
मूळ किंमत ₹ ५००
सवलतीत फक्त ₹ २५० मध्ये!

आपण पुढील क्रमांकावर Gpayने पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. त्यानंतर कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर WhatsApp/sms करावा.

संपर्क/WhatsApp/Gpay : 9850962807

You may also like…