नक्षत्र

360.00

(Nakshatra)
तीन नाटके
ले. रमेश कोटस्थाने

प्रा. रमेश कोटस्थाने हे नाव नाट्यक्षेत्रातील जाणत्या प्रेक्षक-समीक्षक रसिकांना चांगले परिचित आहे.

अर्ध्या शतकाहूनही अधिक काळ त्यांनी नाटक, एकांकिका, नभोनाट्य, एकपात्री प्रयोग, बालनाटिका, नाट्यछटा आदी विविध प्रकार सातत्याने लिहून हे नाव केलेले आहे.

अनेकविध स्थानिक ते राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांच्या कलाकृती कितीतरी संघांनी सादर केल्या आहेत, अजूनही करीत आहेत.

पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक, कुमार कला केंद्राचे `सवाई लेखक` हे गौरवचिन्ह, साहित्य संघाचा `डॉ. भालेराव` पुरस्कार व लेखनाची अनेक प्रथम पारितोषिके या नावाला सार्थ करीत आहेत.

बंधमुक्त, वानप्रस्थाश्रम, संगीत समिति स्वयंवर, ओनामा, कोsहम् या मूळ एकांकिका. त्यांच्यातून हे नवीन, दोन अंकी- तीन नाटकात रूपांतर!

राज्य स्पर्धेसाठी नाटक हवे म्हणून सुधाकर निसळ, सदाशिव अमरापूरकर, यादव खैरनार, प्रशांत हिरे आदी अनेक निशाचर मंडळी पछाडून टाकीत. या साऱ्यांची `धून-लगन` अशी किमयागार होती की लेखकाच्या शब्दांना रंग-रूप आले, संजीवन लाभले. त्यांच्या स्मरण-दिव्यांच्या प्रभेनेच हे नाट्य-त्रयीचे नक्षत्र झळकतेय…

Description

ISBN : 978-81-959843-1-2

You may also like…