पन्नाशी

350.00

(Pannashi)

ले. विजय येलमेलवार

`करल्स`, `झुमरकमकम` या वैशिष्ट्यपूर्ण नावांच्या अतिशय वाचनीय पुस्तकांचे लेखक श्री. विजय येलमेलवार. आणि त्यांचं हे नवंकोरं पुस्तक `पन्नाशी!`

विजयजींना माणसं वाचायला आवडतात. या प्रत्यक्ष माणसांना वाचण्याचा मनसोक्त अनुभव घेतल्यावर ही माणसं जेव्हा त्यांच्या समर्थ लेखणीतून कागदावर उतरतात, तेव्हा वाचकाच्या डोळ्यांसमोर ही माणसं अक्षरक्ष: साकार होतात.

हे सारं लेखन आपल्या सर्वांना आवडणाऱ्या पाणी-पुरीसारखं आहे. पहिली तोंडात टाकताक्षणी नाका-डोळ्यातून पाणी येतंच येतं. पण म्हणून का दुसरीचा मोह सुटतो? रुक्ष जीवनाचं थोडं तिखट, प्रेमाच्या क्षणांचा गोडवा, विनोदी अनुभवांचं आंबटपण, नानाविध अनुभवांचे नानाविध मसाले, अशांची बनलेली ही पाणीपुरी सर्वांसाठी सादर करत आहोत. ही वाचकांना नक्की आवडेल, अशी खात्री आहेच!

– प्रकाशक

You may also like…