माझं भटकेपण

240.00

(Maza Bhatakepan)

भटकणं हा कविता मेहेंदळे यांचा अत्यंत आवडीचा छंद. नाविन्याची ओढ असलेल्या कविताजींना जादूगार निसर्ग सतत साद घालत असतो. असा विविध ठिकाणचा वैविध्यपूर्ण निसर्ग अनुभवल्यावर तो वाचकाच्याही डोळ्यासमोर उभा करण्याचं त्यांच्या शब्दांत, लेखणीत असलेलं सामर्थ्य पानोपानी जाणवतं.

`माझं भटकेपण` या पुस्तकात कविता मेहेंदळे यांचे असेच विविध ठिकाणच्या निसर्गाचे, संस्कृतींचे रूप आपल्यासमोर साकार करणारे १३ अतिशय वाचनीय लेख आहेत. याच्या वाचनातून आपण गुहागर, केळशी, पेंच, कर्नाटक अशा भारतातील स्थळांपासून ते ऑक्सफर्ड, केंब्रिज, हाईड पार्क अशा परदेशीच्या स्थळांचीही मनसोक्त भटकंती करून येतो. अगदी शेक्सपिअरच्या घरातही जाऊन येतो…

कविताजींच्या लेखणीतून उतरलेल्या निसर्ग-प्रवास वर्णनांची आवड असलेल्या वाचक वर्गास हेही लेखन नक्कीच आवडेल.

You may also like…