मिश्र वैद्यक – काळाची गरज

230.00

(Mishtra Vaidyak – Kalachi Garaj)
ले. डॉ. अनिल वैद्य

‘मॉडर्न सायन्स’आणि आयुर्वेद या दोन्ही शास्त्रांची जशी वैशिष्ठ्ये आहेत; तशाच न्यूनताही आहेत. दोन्हीतील न्यूनता काढून टाकून, एकाच रुग्णाच्या आजारात, त्यांचा जरुरीप्रमाणे वापर केल्यास कुठलाहि रोग असाध्य राहणार नाही, हा निष्कर्ष डॉ. अनिल वैद्य यांच्या प्रदीर्घ अशा ५० वर्षांच्या अनुभवावर आधारित आहे.

थंड प्रदेशात भूकपचन चांगले असते, उलट आपल्या उष्ण हवामानात अपचन; त्यामुळे होणारी अॅसिडिटी बहुतेकांना असते. पचन, हृदयाचे कार्य, लिव्हर फंक्शन हे सुधारले असता कुठलाही आजार होत नाही, आरोग्य नीट राहते असा डॉक्टरांचा अनुभव आहे.

आपण आत्ता वापरत असलेले शास्त्र इंग्लंडच्या थंड प्रदेशातले असल्याने जसेच्यातसे आपल्या उष्ण प्रदेशात लागू पडत नाही. म्हणूनच आपण दोन्ही पॅथीचा समन्वय साधून आपल्या देशातील रोग अभ्यासल्यास कुठलाही रोग असाध्य राहणार नाही आणि कुठल्याही आजारात तिन्हीत्रिकाळ औषध घेण्याची गरजच उरणार नाही व आपल्या देशाचे आरोग्य निश्चितपणे सुधारेल, या तळमळीतून डॉक्टरांनी स्वत:च्या सखोल अभ्यास, संशोधन आणि प्रत्यक्ष केलेल्या प्रयोगांतून आलेल्या अनुभवांतून या पुस्तकात जे विचार मांडले आहेत, ते केवळ वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींसाठीच नव्हे, तर सामान्य वाचकांसाठीही उपयुक्त आहेत.

You may also like…