रानगर्भातील रानफुले

300.00

(Rangarbhatil Ranphule)
संपादक: श्री. चुडाराम बल्हारपुरे
~
‘रानगर्भातील रानफुले’ हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह अनेक अर्थांनी खास आहे. नवीन आणि अनुभवी अशा दोन्ही कवींच्या कवितांचा येथे सादर झालेला आविष्कार अतिशय मनोरम आहे. प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे मला एक वैशिष्ट्य वाटते. अनेक कवींच्या कविता येथे वाचायला मिळत असल्यामुळे विषय, आशय, मांडणी, शब्दांची निवड, कवीची व्यक्त होण्याची शैली यांबाबतीत वाचकाला कमालीची विविधता अनुभवावयास मिळत असल्यामुळे पुस्तकाची एकूण वाचनीयता वाढते. कुठेही तोचतोचपणा येत नाही. एका क्षणात हसवणारी एखादी कविता वाचल्यावर, पुढची कविता आपल्याला काहीतरी गहन चिंतन करायला लावते. प्रेम, विरह, दु:ख, चिंता, वेदना, आक्रोश, राग, भूतकाळातील आठवणी, वर्तमानातील आव्हाने, शेतकऱ्यांची वेदना, त्यांच्यापुढील समस्या, कठीण काळातही बाळगलेला स्वाभिमान, समाजातील अनेक बाबतीतील विसंगती, व्यसनांनी होणारी दुर्गती अशा विविध बाबींवर थोडक्या शब्दांत फार सखोल चिंतन करणाऱ्या या कविता आहेत. अनेक कवितांत फार सुंदर शब्दांत जीवनाचे चांगले-वाईट वास्तव समोर आणले आहे. जगावे कसे, याचे फार मौलिक मार्गदर्शन काही कवितांत करण्यात आले आहे. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या संग्रहातील कविताही मला भावून गेल्या. काही कवितांमध्ये भविष्याबद्दल दाखवलेला आशावादही तितकाच महत्वाचा आणि आवश्यक आहे.

एकूणच ‘रानगर्भातील रानफुले’ हा संग्रह वाचकाला कविता या लेखनप्रकाराच्या प्रेमात पाडू शकेल असा कवितांचा संग्रह झाला आहे. याचे श्रेय संग्रहातील सर्वच कवींना आणि संपादक श्री. बल्हारपुरे यांना आहे.

– पराग र. लोणकर (प्रकाशक, लेखक व प्रमुख कार्यवाह- अ. भा. मराठी प्रकाशक संघ)

You may also like…