Sale!

वंदनीय

200.00

(Vandaniya)

गत जीवनातल्या आठवणींचं चर्वितचर्वण करण्याचा मोह सगळ्यांनाच होतो आणि त्या आठवणी सुखद अन् गंमतीशीर असल्या तर त्यात रममाण होणं, तसंच त्या ‘शेअर’ करण्यात इतरांनाही तितकीच सुखाची अनुभूती देतं.

‘वंदनीय’चे लेखक श्री. दत्तात्रेय दामोदर पाठक यांच्या जीवन जडणघडणीत त्यांच्या ताई, म्हणजे आते आत्या आणि तात्या, म्हणजे आते आतोबा यांचा सिंहाचा वाटा आहे.

या पुस्तकातील ताई आणि तात्या यांच्या संबंधीच्या लेखकाने निवेदन केलेल्या आठवणी, लेखकाचे जून १९५५ ते एप्रिल १९६४ या कालखंडातील चाळीसगाव येथील वास्तव्यातील आहेत. परंतु या केवळ वैयक्तिक आठवणीच नसून संस्मरणीय आठवणींचा हा ठेवा एका खजिन्यासम आहे, जो त्या काळातलं राहणीमान, सामाजिक परिस्थिती, कृतसंकल्पता, कौटुंबिक व सामाजिक बांधिलकी, भावनिक व स्नेहल नातेसंबंध, व्यवहार ज्ञान, विविध सण व उत्सव आणि समाजातील रितीरिवाज, व्यक्तिविशेष व त्यांचे स्वभाव, संस्कार, संस्कारक्षम घरांमध्ये मिळणारे धार्मिक शिक्षण, त्या काळच्या शिक्षण संस्था व तेथील शिक्षण पद्धती यांचा आजच्या पिढीला परिचय करून देईल आणि तो काळ जगलेल्या आजच्या ज्येष्ठांना त्या काळात घेऊन जाईल.

या कालखंडात घडलेल्या विविध घटना, प्रसंग, गमतीचे विनोदी प्रसंग वाचताना वाचकाचे वर्तमानाचे भान हरपून, वाचक एखाद्या ‘टाईम मशीन’मध्ये बसल्याप्रमाणे त्या कालखंडात जाऊन, मनसोक्त मुशाफिरी करत आनंददायी पुनःप्रत्ययी अनुभव हमखास घेईल…..

– प्रकाशक.

You may also like…