वर्तुळ (भाग २)

360.00

(Vartul Part 2)

ले. किरण आचार्य
~

आपला भारत आज नक्कीच प्रगतीपथावर आहे. या प्रगतीचे श्रेय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत ज्या शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, शिक्षक, विचारवंत, अभ्यासक आदि मंडळींनी अतोनात परिश्रम घेतले आहेत, त्यांना आहे. अगदी राजकारणी मंडळींनाही आहे. मग असं सगळं चांगलं असताना ते अधिक चांगलं का नाही? याचा विचार अनेकदा दुर्लक्षित होतो, जो तितकाच महत्वाचा असतो.

हा महत्वाचा विचार करण्याचं काम श्री. किरण आचार्य यांचं हे पुस्तक करतं. आज अनेक बाबतीत जी ‘चलता है!’ संस्कृती निर्माण झाली आहे, ती कशी अयोग्य आहे याची जाणीव हे पुस्तक आपल्याला करून देतं.

‘स्मार्ट सिटी’ सारख्या आपल्याला आकर्षक वाटणाऱ्या उपक्रमातील वास्तव आपल्याला येथे उदाहरणासह कळतं. विद्यार्थ्यांना एखाद्या इयत्तेपर्यन्त सरसकट उत्तीर्ण करण्यातला विद्यार्थ्यांच्याच दृष्टीने असलेला धोका किरणजी समजवून देतात. अनेक बाबतीत सरकारी पातळीवर किती विचित्र, अनाकलनीय आणि विरोधाभासी निर्णय घेतले जातात ते किरणजी सोदाहरण स्पष्ट करतात. अनेक गोष्टींमधील विसंगती ते आपल्या लक्षात आणून देतात. आणि हे सारे सांगताना काय व्हायला हवे, कसे असायला हवे, हेही ते सांगतात.

एकूण या पुस्तकात श्री. आचार्य यांचा प्रयत्न आपल्या देशातील विविध समस्यांचे मूळ शोधून काढण्याचा आहे, जो अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यामुळेच ‘वर्तुळ’ मालिकेचा हा भाग प्रत्येकाने वाचायलाच हवा असा आहे. आवश्यकता आहे ती हे पुस्तक आपली स्वत:ची मते, स्वत:च्या पक्षनिष्ठा आणि स्वत:चा (ठराविक मते आवडून घेण्याचा आणि बाकीची मते बाजूला ठेवण्याचा) चश्मा बाजूला ठेवून हे पुस्तक वाचण्याची…

– पराग रघुनाथ लोणकर (प्रकाशक व लेखक)
*

You may also like…