वर्तुळ भाग ३
₹450.00
(Vartul 3)
ले. किरण आचार्य
~
कथा, ललित लेख, कविता, वैचारिक अशा सर्व प्रकारच्या लेखनात तितकेच कौशल्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखक श्री. किरण आचार्य यांचा हा ‘वर्तुळ’ पुस्तकमालिकेचा तिसरा भाग- विविध व्यक्ती, घटना आणि प्रसंगांचा सर्व बाजूने विचार करणारा, त्यावर भाष्य करणारा आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असंख्य घटना घडतात. त्या कमी-जास्त महत्वाच्या असल्या तरी त्यांचे काही ना काहीतरी महत्व असते. चुकलेले निर्णय, भेटलेली विक्षिप्त माणसे, आलेले वाईट अनुभव, झालेली फसवणूक, असं आणि असं बरंच काही आपल्या जीवनात असतं. त्यांवर प्रत्येकाने विचार, चिंतन करणं, त्यातून धडे घेणं अपेक्षित असतं. परंतु हे सगळं करायला आज फारसा वेळच कुणाकडे नाही अशी दुर्दैवाने परिस्थिती आहे. प्रत्येक जण धावत सुटला आहे. काही क्षण थांबून आपल्या जीवनाचं अवलोकन करण्यासाठी वेळ काढणंच अशक्य झालं आहे. अशा आपणा सर्वांसाठी हे काम श्री. किरण आचार्य यांनी या पुस्तकात करून ठेवलं आहे.
एका अर्थाने हे पुस्तक व्यक्तिचित्रांचेही आहे. एकेका व्यक्तीचा परिचय, त्याची स्वभाववैशिष्ट्ये, त्याला इतरांचे किंवा त्याचे इतरांना आलेले अनुभव वाचताना आपण या साऱ्यात गुंगून जातो. त्या त्या प्रसंगांचे आपण अगदी तेथे स्वत: हजर असल्यासारखे साक्षीदार होतो आणि त्यामुळे आपले कमालीचे मनोरंजन होते. लेखकाच्या कॉलेजजीवनातील, मित्रपरिवारातील येथे मांडलेले अनेक अनुभव विलक्षण आहेत, वेगळे आहेत.
एखादा चित्रपट जसा- ‘चुकवू नये असा आहे’ असे आपण म्हणतो, तसे हे पुस्तक ‘चुकवू नये असं’ आहे. श्री. किरण आचार्य यांच्या लेखनाच्या प्रेमात पाडेल असे बरेच काही या लेखनात जागोजागी आहे.
– पराग रघुनाथ लोणकर (यांच्या प्रस्तावनेतून)
(प्रकाशक, लेखक आणि प्रमुख कार्यवाह अ. भा. मराठी प्रकाशक संघ)