शहारा!

360.00

आपण 9850962807 या क्रमांकावर Gpayनेही पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. अश्या पद्धतीने सवलतमूल्य जमा केल्यास कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर whatsapp/sms करावा.

(Shahara)

`रम्य ते बालपण!`

जणू त्याला दृष्ट लागेल या भीतीनं गणित, भूगोल, परवचा, पाढे इ. अघोरी उपाय, उतारे केले जात…

पण त्या स्वप्नाळू वाढवयात कै. बाबूराव अर्नाळकरांनी आमच्यासाठी एक अद्भूत सृष्टी निर्माण केली. `रम्य` या शब्दाचे फक्त त्यांच्याच रहस्यकथांनी सार्थक केले.

मध्यरात्री खून पडावा, अचानक टेलिफोन यावा, कोसळत्या पावसात पाठलाग व्हावा, काळ्या मोटारीच्या डिकीतून रस्त्यावर कुणालातरी ढकलले जावे, अशा विलक्षण अन् `चित्त-चक्षू-चमत्कारिक` गोष्टींचे रमलजाल होते म्हणून जमिनीवरचे जगणे सुसह्य झाले.

नंतर पाश्चात्य साहित्याची ओळख झाली, आवड लागली. शेरलॉक होम्स, पेरी मेसन, डेरेक, हर्क्युल पॉयरो हेही माझे हिरो झाले आणि हे सारे वाचता वाचता लिहावेसेही वाटू लागले.

‘शहारा मधील या रहस्यकथा, नित्याच्या चाकोरीबंद जगण्याच्या चक्राला काही वंगण, इंधन मिळावे, करकर कमी व्हावी या उद्देशाने लिहिलेल्या आहेत. ही निव्वळ आक्रीताच्या आनंदासाठी वसवलेली रोमांचक स्वप्नसृष्टी, वाचकाला काही क्षण एका वेगळ्याच, रोमांचक जगात घेऊन जाईल हे निश्चित…

– प्रा. रमेश कोटस्थाने

Description

प्रा. रमेश कोटस्थाने

You may also like…