साठा उत्तराची कहाणी!

350.00

`महाराष्ट्र शासनाचा` मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार प्राप्त पुस्तक!

(satha uttarachi kahani…)

ले. वीणा सामंत

लेखिका वीणा सामंत म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व! सदैव सकारात्मक दृष्टिकोन आणि `नेव्हर से डाय` म्हणणारं सळसळतं चैतन्य! त्यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात, हरेक प्रांतात समरसून रस व भाग घेतला. त्यांना वर्ज्य असं कुठलंच क्षेत्र नव्हतं. त्यातही ध्येयपूर्तीसाठी केवळ हुनर व परिश्रम पुरेसे नसतात याचं बाळकडू त्यांना लहानपणापासून सातत्याने समोर येणाऱ्या आव्हानांमुळे आणि या आव्हानांना त्यांनी दिलेल्या समर्थ झुंजीमुळे मिळत गेलं. `फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह` हे त्यांच्या बाबतीत अगदी खरं ठरलं. संकटांना न भिता सामोरं जाऊन त्यांवर मात करण्याच्या त्यांच्या झुंजार वृत्तीला बऱ्याच वेळा काही देव माणसांची अकस्मात आणि बहुमूल्य साथ मिळाली आणि मार्ग सुकर होत केला. अत्यंत प्रतिकूल, जमिनीत गाडू पाहणाऱ्या- परिस्थितीच्या रेट्याला निर्धारपूर्वक परतवून, मातीतून डोकं वर काढणाऱ्या कोंबाच्या विजिगिषू वृत्तीने, स्वयंप्रेरणेने फोफावत त्यांनी आपलं स्थान निर्माण करणं हेच केवढं तरी कर्तृत्व, पण त्याहीपेक्षा, सर्व संकटांना तोंड देत अपार जिद्दीने आणि चिकाटीने आपल्या स्वप्नांना परिश्रमपूर्वक आकार देणं, आपल्या मुलांना उत्तम भविष्यकाळ लाभावा यासाठी त्यांच्यावर आदर्श संस्कार करत त्यांच्या शिक्षणासाठी अथक आणि सतत झटून त्यांचे जीवन घडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, ही तर मोठीच साधना म्हणता येईल. एक कुटुंबवत्सल सुगृहिणी, आपल्या कुटुंबावर संरक्षक तसेच मायेची ऊबदार पंख पसरवणारी पक्षिणी, कोणत्याही आपदा आणि श्वापदांचा सामना करणारी रणरागिणी, अश्या या आदर्श आईची ही `साठा उत्तराची` सुफळ संपूर्ण झालेली `कहाणी`…

You may also like…