साहित्यक्षेत्रातील एकलव्य – अण्णा भाऊ साठे

480.00

(Annabhau Sathe)

ले. सुभा लोंढे

‘साहित्यक्षेत्रातील एकलव्य अण्णा भाऊ साठे’ हे सुभा लोंढे यांनी लिहिलेले पुस्तक अण्णाभाऊंच्या साहित्याचा व जीवनाचा प्रवास अधोरेखित करते. येथे कल्पनाशक्तीच्या बळावर विविध नात्यांच्या माणसांकडून अण्णाभाऊंसंदर्भात कथन करण्याचा कठीण असलेला नवा प्रयोग सुभाताईंनी रुजवलाय. त्यांची प्रत्येकाची जीवनकथा येथे व्यक्त झालीय. नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि संवाद-विसंवाद अभिव्यक्त झालाय.
या लेखनातील संवाद व्यक्तींच्या स्वभावावर प्रकाश टाकतात. परिस्थितीचे दर्शन घडवतात. अण्णाभाऊंचा साहित्यप्रवास सुद्धा येथे पुराव्यांसह मांडलाय. त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि नायिकांचा प्रवास येथे जीवंत केला गेलाय. एक वेगळा प्रयोग म्हणून या लेखनाचे मूल्य निर्णायक महत्वाचे आहे. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊंची सत्यकथा समजून घेताना सुभाताईंचे हे लेखन उपयुक्त ठरते.
– डॉ. श्रीपाल सबनीस
(सुप्रसिद्ध लेखक, अभ्यासक, समीक्षक व ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष)
~

अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनात जो संघर्ष झाला, तो संघर्ष व विद्रोह सुभा लोंढे यांनी येथे आपल्या लेखणीतून मांडला आहे. अण्णाभाऊंच्या स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या भूमिकेतून हा ग्रंथ साकारण्याचे अवघड काम त्यांनी केले आहे. पुढील पिढ्यांना अण्णा भाऊ साठे व त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी हे लेखन फारच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
– श्री. दादासाहेब सोनवणे
(माजी दलित स्वयंसेवक संघ प्रमुख)
~

अण्णाभाऊंचे चरित्र मांडताना सुभा लोंढे यांनी हातात लेखणी न घेता सप्तरंगी कुंचल्याने रेखाटले आहे असे वाटते. त्यामुळे हे चरित्र सजीव झाले आहे. अपार कष्टांतून अण्णाभाऊंसारखा लेखक कसा उभा राहिला, आपल्या शाहीरीतून मराठी जनमानसात माणुसकीचं, सत्याचं व सत्वाचं जागरण कसा करू शकला, त्याचं चरित्ररूपी चित्रण करण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत. अण्णाभाऊंची पुस्तकं, पोवाडे, गीते, त्यांच्या कादंबऱ्यांवर निर्माण झालेले चित्रपट व त्यांचा रशियाचा प्रवास, हे सगळं काही मती गुंग करणारं आहे.
– श्री. बाळ ल. भारस्कर.

You may also like…