हनिमून आजी-आजोबांचा!

300.00

(Honeymoon Aaji-Aajobancha)

`हनिमून आजी-आजोबांचा` या कथासंग्रहात आहेत, आजच्या धकाधकीच्या जीवनात विनोदाचा शिडकावा करुन प्रसन्नतेची बाग फुलवणाऱ्या गमतीशीर विनोदी कथा.

‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना,’ अशा मनोवृत्तीच्या, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि संसारात मुरलेल्या या जोडप्यांच्या जीवनात घडणारे विनोद वाचून वाचक नक्की सुखावतील. दोन व्यक्तींच्या अनेक वर्षांच्या सहजीवनात प्रेम आणि समस्या दोन्ही असतातच. किंबहुना; त्या त्यांच्या नात्याचाच अंगभूत भाग असतात. या कथांतून हे वास्तव अगदी हसतखेळत अधोरेखित केलं आहे.

आजी-आजोबांच्या व कुटुंबातील इतरही मंडळींच्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगांवरील या कथा वाचून, ताणतणाव निर्माण करणाऱ्या लहान-मोठ्या समस्यांकडे बघण्याचा वाचकांचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकेल.

**

Description

सौ. गौरी सुभाष गाडेकर
(पूर्वाश्रमीची कु. उषागौरी मधुसूदन नाडकर्णी)

शिक्षण: बी.एससी, एलएलबी (जनरल), पीजी डिप्लोमा इन ट्रान्सलेशन.

`बँक ऑफ इंडिया`त ऑफिसर. आता स्वेच्छानिवृत्त.

`माहेर`, `स्त्री`, `अनुराधा,` `हंस,` `कथाश्री,` `जत्रा,` `ललना,` `सा. सकाळ,` `मानिनी,` `अपूर्व,` `न्यू वूमन,` `दामिनी,` `इंद्रायणी,` `गार्गी` वगैरे मासिकांतून कथा प्रसिद्ध. ‘अक्षर’, ‘मिळून साऱ्याजणी’, ‘माहेर’, ‘निमोहक’ वगैरे दिवाळी अंकांतून/ मासिकांतून अनुवादित कथा प्रसिद्ध.

`मधुश्री प्रकाशन`तर्फे `नातं` हा कथासंग्रह २००७ मध्ये प्रकाशित. त्याची दुसरी आवृत्ती `अरिहंत प्रकाशन`तर्फे २०१२ मध्ये प्रकाशित.
`मधुश्री प्रकाशन`तर्फेच `आउटसायडर, सहज वगैरे` व `तिसरं पुस्तक` हे कथासंग्रह २०१९ मध्ये प्रकाशित.
`मेहता पब्लिशिंग हाऊस`तर्फे `वादळातील दीपस्तंभ` व `मृत्यूवर मात` ही अनुवादित पुस्तकं प्रकाशित.

`नशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ब्लाईंडस`तर्फे `नातं`ची ऑडिओ सीडी प्रकाशित.

‘ई -अभिव्यक्ती’ या डिजिटल साहित्यिक दैनिकात अनेक कथा, लेख, कविता प्रकाशित.

~~~~~~

You may also like…