अभिनय कलादर्पण
₹250.00
(Abhinay Kaladarpan)
ले. शिवाजी देशमुख
मराठी भाषेतून अभिनय कलेबद्दल फारसे साहित्य उपलब्ध नाही. श्री. शिवाजी देशमुख यांचा रंगभूमी व चित्रपटांचा प्रत्यक्ष अनुभव, अनेक ज्येष्ठ अभिनेत्यांचा प्रत्यक्ष अभिनय पाहून त्यातून केलेल्या अचूक निरीक्षणातून काढलेले निष्कर्ष आणि विविध अभ्यासकांच्या इंग्रजी आणि मराठी लेखनातून मिळवलेले ज्ञान येथे दिले आहे.
प्रत्येकच क्षेत्रामध्ये संघर्ष करावा लागतो; तसा अभिनय क्षेत्रातही करावा लागतोच. कलाकार हा स्वयंस्फूर्तीने घडत असला, तरी त्यालाही उचित मार्गदर्शनाची गरज असते. हेच मार्गदर्शन ‘अभिनय कलादर्पण’ हे पुस्तक करते.
अभिनयात ‘करिअर’ करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शक ठरेल असे हे लेखन आहे.




