अर्थना

230.00

(Arthana)

ले. खालीदा शेख
~
सुप्रसिद्ध नाटककार श्री. संभाजी सावंत यांच्या प्रस्तावनेतील काही:-

‘अर्थना‌’ ही कथा आहे स्नेहल नावाच्या महिलेची. तिने आपल्या पतीसह घेतलेल्या एका निर्णयाची. मात्र तिच्या विचारधारेला वळण देणारे अन्य प्रवाहही येथे आहेत आणि तेही महत्त्वाचे आहेत.

जागतिकीकरणानंतर काळाच्या आजच्या टप्प्यावर समाजातील अनेकांच्या बाबतीत काही समस्या थोड्याफार फरकाने एकसारख्याच आहेत, हे खालीदा शेख ह्यांच्या मनाने टिपले आहे, आणि पंखात बळ येताच पिल्ले स्वतःचा पैस शोधण्याच्या महत्त्वाकांक्षेने दूर उडून गेल्यानंतर मागे घरात उरलेल्या आई-बाबांची पिल्लांना आणि त्यांच्या पिल्लांना भेटण्याची ओढ आणि नकोसा वाटणारा एकटेपणा, आदी सारे ह्या कथेत असले, तरी वृद्धत्वानंतर आयुष्याची अखेर मात्र ‘नकोशी वाटेल अशी‌’ असू नये, म्हणून खालीदा शेख ह्यांची लेखणी इथे काही मार्ग दाखवते आहे; ज्याला शास्त्रीय आणि कायदेशीर आधार आहे.

खालीदा शेख ह्यांचा पिंड मुळात प्रचंड आशावादी आहे. त्यांच्या आधीच्या पुस्तकांतही ते जाणवतं. प्रस्तुत ‘अर्थना‌’ ह्या कथेतही हा आशावाद आहे. मात्र त्यासाठी हे पुस्तक वाचणं आवश्यक आहे. मानसिक आंदोलनांनी पुढे सरकत जाणारी ही ‘अर्थना‌’ नावाची कथा वाचकाला गुंतवून ठेवते.

‘लिव्हिंग विल,’ अर्थात ‘जगण्याबाबतचे इच्छापत्र‌’ याचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘अर्थना‌’ ही कथा वाचकांना वेगळी दृष्टी देईल!

You may also like…