आयुष्य हे..!

370.00

(Aayushya hey..!)

ले. शिवाजीराव देशमुख
~

‘आयुष्य हे…!’ या साध्या, सरळ व ओघवत्या भाषेतील कादंबरीतील नाट्यमयता वाचकाला खिळवून ठेवते. एखाद्या सुंदर चित्रपटाप्रमाणे ही कादंबरी आपल्यासमोर साकारली जाते. नायकाचा जीवनप्रवास सादर करताना त्याच्या आयुष्यातील प्रेम, माया, नातेसंबंध, यांबरोबरच जीवनातील सर्व क्षेत्रातील राजकारणास (अगदी अध्यात्मासारख्या क्षेत्रातीलही) स्पर्श करत ही कादंबरी माणसाचा खरा मुखवटा उघड करते.

लेखक श्री. शिवाजी देशमुख व्यावसायिक रंगभूमीवरील एक यशस्वी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून आपल्याला परिचित आहेत. ‘आयुष्य हे…!’ मध्ये मात्र श्री. देशमुख यांनी आपल्यातील नाटककार कुठेही डोकावू दिलेला नाही. एखाद्या सराईत कादंबरीकाराप्रमाणे केले गेलेले हे लेखन आहे. आणि त्यामुळेच श्री. शिवाजीराव देशमुख विशेष अभिनंदनास पात्र आहेत.

– पराग रघुनाथ लोणकर
(प्रकाशक व लेखक)

You may also like…