कोणतंही पान
₹300.00
(Kontahahi paan)
ले. कविता मेहेंदळे
ललितलेखनात आज कविता मेहेंदळे यांचे नाव सुप्रतिष्ठित आहे. हे स्थान त्यांच्या लेखणीच्या सामर्थ्याला मिळालेली पावती आहे! आपल्या लालित्यपूर्ण शैलीत कविता मेहेंदळे ललित गद्याची परंपरा पुढे नेत आहेत.
‘कोणतंही पान’ हा त्यांचा नवा ललित गद्यसंग्रह. शीर्षकाप्रमाणेच, कोणतेही पान वाचावे आणि त्यात हरवून जावे, असाच अनुभव वाचकांना आल्याशिवाय राहणार नाही. पन्नास ललितलेखांचा हा संग्रह. यातील प्रत्येक लेख डौलदार आहे, जीवनातील चैतन्य आणि सकारात्मकता ‘कोणतंही पान’मधील प्रत्येक पानात दर्शन देते.
निसर्गाचे ध्वनी-प्रतिध्वनी कविता मेहेंदळे यांच्या साहित्यात उमटले आहेत. समुद्रकिनारा असो किंवा राधेची कथा, मंगलमय आणि तेजोमयी सूर्योदय असो किंवा पारिजातकाचा बहर, निसर्गाचे, अमर व्यक्तिरेखांचे बंध वाचकांनाही मोहवून टाकतात. हेच कविता मेहेंदळे यांच्या लेखणीचे यश आहे.
मोहवून टाकणारी लडिवाळ आणि लयबद्ध भाषा, हा कविता मेहेंदळे यांचा विशेष! यात शब्दांचे कारंजे आहे, त्याचवेळी निसर्गाकडे, जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी आहे.
– डॉ. दीपक टिळक
विश्वस्त-संपादक केसरी
कुलपती, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ