‘चरैवेति! चरैवेति!!’

400.00

(Charaiveti Charaiveti)

‘चरैवेति! चरैवेति!!’ ‘चालत रहा! चालत रहा!!’ हा आपल्या धकाधकीच्या जीवनाचा मूलमंत्र आहे. चालण्याचे अनेकविध फायदे सर्वज्ञात आहेतच. पण चालण्याचा मथितार्थ, ‘आपण चाललात तरच दीर्घायुषी व्हाल!’ आणि दीर्घायुष्यासाठी हवी ‘मित आहार, योग्य विचार आणि माफक विहार’ ही त्रिसूत्री, आणि या सर्वांचं मूळ म्हणजे सकारात्मकता! सकारात्मकतेनेच शारीरिक स्वास्थ्य आणि परिणामी मानसिक समाधान प्राप्त होईल, ज्यायोगे आपण खरा जीवनानंद उपभोगू शकू. शिवाय ‘चालत रहा!’ हा मंत्र ‘सदोदित उत्साही मनोवृत्तीने, न कंटाळता स्वत:ला आनंद देणार्‍या कोणत्या ना कोणत्या कृतीत कार्यरत ठेवा, कायम कृतिशील रहा!’ असंही आपल्याला सांगत असतो.

लेखकाचं वाचन, त्यानं सभोवतालचं केलेलं सूक्ष्म निरीक्षण आणि स्वानुभव यांचं दृश्य स्वरूप म्हणजे ‘चरैवेति! चरैवेति!!’ मधील साध्या, सरळ दृष्टिकोनातून निवेदित सकारात्मक विचारसरणी आपल्यालाही कमालीची भावते. आपल्या जीवनामध्ये अनेक लहान मोठ्या गोष्टींचं किती महत्वं असतं, ते कधी आपल्या लक्षात येतं, तर कधी त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या अशा अनेक गोष्टींवर सकारात्मक चिंतन करणारे, सुखमय जीवनाची व्याख्या करणारे, प्रोत्साहनपर आणि माहितीपूर्ण लेख वैशिष्ट्यपूर्ण असेच असून वाचकांना एका सकारात्मक विचारशील पुस्तकाच्या वाचनाचं समाधान देणारे आहेत.

– प्रकाशक

You may also like…