जुळून येती रेशीमगाठी
₹190.00
(Julun Yeti Reshimgathi)
ले. अरविंद जोशी
निरंजन हा एक अतिशय तत्त्वनिष्ठ, नाते-संबंध, मैत्रीसंबंध मनापासून जपणारा तरुण. आपले बँकेमधील काम अतिशय मनापासून आणि चोख करत असतानाच शक्य तेव्हा आपल्या मित्रांना, कुटुंबाला खास वेळ देत जीवनाचा आस्वादही घेणारा! आणि हे सर्व करत असतानाच निर्मळ, खऱ्या प्रेमाच्या शोधातही असलेला.
अशा शोधात असताना निरंजनपुढे कोणते पर्याय उपलब्ध होतात? त्यातील कोणता निवडावा हे तो ठरवू शकतो, की नियतीच ठरवते? प्रेमाचा त्याचा हा शोध संपतो की अपूर्णच राहतो? हे सर्व जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवी अशी कादंबरी- ‘जुळून येती रेशीमगाठी’
*




