डुप्लिकेट ब्रिज आणि बरेच काही!

300.00

(duplicate bridge aani barech kahi)
ले. अरविंद उपासनी

श्री. अरविंद उपासनी ह्यांचा जन्म नाशिक येथे झाला. बालपण आणि पदवीपर्यंत (बी. एस् सी.) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईला स्थलांतर केले. वायेथ कंपनी, रोश कंपनी, बायर इंडिया, सेरम-पुणे (लस बनवणारी), मनीष कंपनी अश्या नामवंत आंतरराष्ट्रीय आणि भारतीय औषधी कंपन्यांमध्ये तळापासून ते जनरल मॅनेजर, डायरेक्टर पदापर्यंत त्यांनी काम केले व कामाव्यतिरिक्त अनेक ब्रिज खेळाडूंशी जवळीक होऊन ह्या खेळाची आवड त्यांच्यात निर्माण झाली. तसे पाहिले तर ह्या खेळाचे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले होते, कारण त्यांचे वडील स्वतः एक उत्कृष्ट ब्रिजपटू होते.

गेली २५ वर्षे त्यांच्या पुण्यातील घनिष्ठ मित्रांच्या संगतीने अरविंदजी ब्रिज स्पर्धा खेळण्यास शिकले आणि त्यांच्या मित्रांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी या खेळातील, स्पर्धांतील बारकावे समजून आत्मसात केले व छोट्या छोट्या स्पर्धेत बक्षिसे मिळवण्यापर्यंत मजल मारली. ह्यापुढील पायरी आत्मसात करावयाची, म्हणजे स्पर्धेचे आयोजन करून टूर्नामेंट डायरेक्टर बनावे आणि ब्रिज खेळाचा प्रसार व खास करून नवोदितांना, तरुण पिढीला मार्गदर्शन करावे असे त्यांना प्रकर्षाने वाटत होते. परिणामस्वरूप त्यांनी टूर्नामेंट डायरेक्टर म्हणून छोट्या छोट्या स्पर्धेत नवी मुंबई, पनवेल, पुणे आणि इतर ठिकाणी मार्गदर्शन केले.

ब्रिजच्या नियमांचे आपल्या मातृभाषेत सुलभ रुपांतर केल्यास मराठीतील ब्रिजप्रेमींना ते उपयुक्त ठरेल असे श्री. अरविंद यांना वाटले. खरं म्हणजे मराठीमध्ये ब्रिज ह्या खेळासंबंधी काही पुस्तकं उपलब्ध आहेत, परंतु नियमांचा अर्थ समजून सर्व नियम मायबोली मराठीमध्ये लिहून, त्याचबरोबर इतर रंजक माहिती असलेले असे हे एकमेव पुस्तक असावे.

You may also like…