नमुने

450.00

(namune)
व्यक्तिचित्रे

ले. रवी मल्ल्या

आयुष्याच्या प्रवाहात अनेक नमुने सातत्याने आपल्याला भेटत असतात, कळत-नकळत आपल्याशी ते जोडले
जातात आणि आपल्यात सहजपणे ते मिसळून जातात. कालांतराने आपण त्यांच्यापासून काय मिळवले किंवा आपण काय गमावले याचा विचार करण्यापूर्वीच आपल्या विचारांवर, व्यक्तिमत्वावर सहजपणे परिणाम करून आपल्यापासून वेगळे होत ते आपला मार्ग बदलतात.

माझ्यावर अधिकार गाजवणारे, माया करणारे, हृदयापासून प्रेम करणारे, तसेच माझा दुस्वास करणारे, मला सतत शह देण्याचा प्रयत्न करणारे, परंतु ते करत असतानाही माझी पाठ न सोडणारे अनेक नमुने सातत्याने माझ्या संपर्कात येत गेले, त्यातील काही निष्पाप, निरागस होते तर काही बेरकी, इरसाल होते. त्यांच्या ओठावर आलेले संवाद ते बेधडकपणे माझ्यावर फेकत माझ्यावर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न करत. मला त्याबद्दल काय वाटेल याचा कधीही विचार न करणारे शेकडो नमुने मला आयुष्यभर भेटले, त्यांच्याबरोबर राहून मी आयुष्य शिकत गेलो…

आणि जर असे हे नमुने इतक्या निरागसपणे किंवा बेधडकपणे स्वतःचे आयुष्य आनंदाने व्यतीत करत आहेत तर मी का म्हणून आलेल्या कठीण प्रसंगांत माझे आयुष्य दुःखात आणि दबावात काढावे अशा विचाराने मी वेळोवेळी जगत गेलो. अशा या नमुन्यांकडून नेहमीच मला ऊर्जा मिळत गेली, आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगात, शह, प्रतिशह, काटशह चाललेले असतात; पण त्या खडतर प्रसंगात आपण स्वतःचा तोल सांभाळत चेहऱ्यावरचे हास्य न गमावता एखादी संवादफेक करून विनोद निर्माण करत आलेल्या प्रसंगाला योग्य उत्तर कसे द्यायचे आणि त्या खडतर प्रसंगाला सामोरे कसे जायचे हे मी या अशा नमुन्यांकडून शिकत गेलो.

संपर्कात आलेल्या अशा नमुन्यांमुळेच माझे आयुष्य परिपूर्ण झाले.

– रवी मल्ल्या

You may also like…