पिढ्या-पिढ्यांच्या पाऊलखुणा

₹320.00

(Pidhya-pidhyanchya paulkhuna)
ले. विजय खाडिलकर

“कोकणच्या मातीत रुजलेले एक कुटुंब, त्याच्या आयुष्यातून वाहत गेलेला काळ आणि त्या काळाबरोबर बदलत गेलेली माणसे…

‘पिढ्या-पिढ्यांच्या पाऊलखुणा’ ही तीन पिढ्यांच्या जीवनाचा प्रदीर्घ पट उलगडणारी कादंबरी आहे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना आपली कोकणी ओळख, घराची शिस्त, रीतिरिवाज आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांचे भावविश्व या कादंबरीत प्रत्ययकारीपणे उभे राहते.

जुन्या घराच्या अंगणापासून मुंबईच्या बदलत्या जीवनापर्यंतचा हा प्रवास आहे. या प्रवासात जन्म-मृत्यू, विवाह, संसार, स्थलांतर, आर्थिक चढ-उतार, माणसांमधील प्रेम, जिव्हाळा, गैरसमज, दुरावा आणि पुन्हा जुळणारे धागे अशा अनेक अनुभवांतून कुटुंबजीवनाचे असंख्य रंग दिसतात. काळ पुढे सरकत जातो, माणसे बदलतात, नाती बदलतात; तरी काही आठवणी आणि काही नाती मनाच्या खोलवर कायम राहतात.

एका पिढीने रुजवलेले संस्कार दुसऱ्या पिढीत कसे जगतात आणि पुढची पिढी त्या मुळांपासून किती दूर जाते, जाऊ शकते, याचा हळुवार आणि चिकित्सक वेध कादंबरी घेते. भूतकाळाच्या सावलीत वर्तमान उभे असतानाच भविष्याकडे जाणाऱ्या पाऊलखुणाही त्यात दिसत राहतात.

माणसांच्या जगण्यातून काळाचा चेहरा टिपणारी, कोकणच्या मातीचा गंध आणि घराच्या आठवणी मनात जागवणारी ही केवळ एका कुटुंबाची कथा नाही; ती प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी जपलेल्या आपल्या ‘मुळांची’ कथा आहे…”

*

You may also like…