प्रकाशधारा
₹350.00
(PrakashaDhara)
ले. कविता मेहेंदळे
वाचनीय कथांच्या माध्यमातून लोकोपयोगी जनजागृती हा फार अपवादाने केला जाणारा प्रयोग येथे केला गेला आहे. समाजाच्या हितासाठी शासनाकडून ज्या ज्या योजना राबवल्या जातात, जे जे उपक्रम चालवले जातात, यांचा कथारूप परिचय करून देणारे हे पुस्तक आहे. अनेक दैनिके, साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकांत आपल्या भेटीस नियमित येणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका कविता मेहेंदळे यांच्या खास अशा दर्जासंपन्न शैलीत उतरलेल्या या कथा असल्याने सामान्यत: माहिती देणारी पुस्तकं थोडीशी किंवा बरीचशी कंटाळवाणी असतात, तसं इथे नाहीये. ‘प्रकाशधारा’ हे जितके माहितीपूर्ण आहे, तितकेच वाचनीय आहे, आणि हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.
~
Categories: stories, प्रकाशित पुस्तके