मला समजलेला आरोग्यमंत्र
₹350.00
(Mala Samjlela Arogyamantra)
ले. वंदना डांबरे
‘निरोगी आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे!’ सर्वांसाठी याच निरोगी आरोग्याचा आणि निरोगी दीर्घायुष्याचा ध्यास घेऊन, अॅड. वंदना डांबरे यांनी अतिशय तळमळीने लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘मला समजलेला आरोग्यमंत्र’ हे प्रस्तुतचे पुस्तक.
आधुनिक काळात वाढती धावपळ, ताणतणाव, स्पर्धा, बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारविहारामुळे अनेक व्याधी माणसाच्या आयुष्याचा भाग बनत आहेत. अशा वेळी जीवनशैलीतील बदल, सकारात्मक विचार आणि निसर्गस्नेही सवयी यांचं महत्त्व अधोरेखित करणारं ‘मला समजलेला आरोग्यमंत्र’ हे पुस्तक वाचकाला आरोग्याकडे एका व्यापक दृष्टीनं पाहण्याची प्रेरणा देतं.
आपली शरीररचना, विविध अवयवांची कार्यपद्धती, पोषण, खनिजे, जीवनसत्त्वे, फळे, भाज्या, धान्ये, मसाले आणि नैसर्गिक अन्नघटक यांची येथे अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. विविध आजार, त्यांची कारणे, त्यांना प्रतिबंध करण्याचे उपाय, जीवनशैलीतील सुधारणा आणि घरगुती पातळीवर अंगीकारता येणाऱ्या अनेक सवयी यांचाही ऊहापोह येथे करण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तक माहितीपर संदर्भग्रंथ आणि आरोग्यविषयक प्रेरणादायी मार्गदर्शक या दोन्ही भूमिका चोख पार पाडतं.
आज प्रत्येकजण उत्तम आरोग्याचा शोध घेत आहे. अशा प्रत्येकासाठी ‘मला समजलेला आरोग्यमंत्र’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.




