मी आस्तिक मी नास्तिक
₹150.00
(Mi astik mi nastik)
‘मी आस्तिक, मी नास्तिक’ हे आहे संबंधित विषयाचा अतिशय मूलभूत आणि सारासार विचार करून केलेलं वैचारिक लेखन. देव आणि धर्माच्या संबंधात लेखकास जे प्रश्न पडले, जे त्याला खटकलं, ते त्यानं मांडलंय! जे लौकीक अर्थाने सांगितले जाते, धर्म मान्यतेनुसार बोलले जाते त्यावरूनच हा उहापोह आहे. इथं कोणा धर्माचा अपमान करण्याचा किंवा कुठल्या धर्माला कमी लेखण्याचा अजिबात हेतू नाही. येथे फक्त काही प्रश्न उभे केले आहेत. लेखकास इथं कुठल्याच धर्माची बाजू घेऊन उभं राहायचं नाही. कुठल्या धर्माचा प्रचारही करायचा नाही! कुणी श्रेष्ठ, कुणी कनिष्ठ असंही म्हणायचं नाही. या जगात देव असावा ही लेखकाची हार्दिक इच्छा आहे. पण देव आहे ही खात्री व्हावी, या खातरजमेसाठी या साऱ्या लेखनाचा खटाटोप केला आहे.
लेखक इथं कुणा धर्माच्या बाजूने नाही. कुठल्याच पंथाचा पुरस्कर्ता नाही. तो देव आहे याही बाजूचा नाही, अन् देव नाही याही मताचा नाही! त्याच्या मनाला जे वाटतं, ते त्यानं मांडलंय आणि हे सारंच लेखन आस्तिक आणि नास्तिक अशा दोघांनीही वाचलंय पाहिजे असं आहे…