मुक्काम पोस्ट खोरनिनको
₹400.00
(Mukkam Post Khorninko)
ले. जयवंत माजलकर
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील खोरनिनको या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, निसर्गरम्य वनराईने नटलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि विशाळगड व पावनखिंड यांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या खोऱ्याशी संबंधित कथा, त्यातील घटना, माणसं असलेला ‘मुक्काम पोस्ट खोरनिनको’ कथासंग्रह अतिशय वाचनीय आहे.
इंदू काकी, नाऱ्या, बाबू गुरव, रखमा दादा, वाघ्या अशी या कथासंग्रहातील जगावेगळी माणसं गावाला जिवंतपणा आणत असतात. माजलकरांच्या कथानकातील ही माणसं आपल्या आसपास वावरत असल्याचा भास होतो.
– गंगाराम गवाणकर




