मूलाधार
₹250.00
(Mooladhar)
ले. कविता मेहेंदळे
श्री. सुधीर गाडगीळ यांचा अभिप्राय:-
‘’नवीन प्रसंग, घटना रोज घडत असतात. त्याविषयी मनाच्या तळाशी उमटलेल्या प्रतिक्रिया या ‘चिंतन वजा विचार’ बनतात. क्षणभंगुर वाटणारे, परंतु काही काळ त्यामध्ये रमायला लावणारे विचार ‘आधार’ वाटू लागतात.
‘वय वेडं असतं’, ‘विस्मरणाची ऐशी-तैशी’ किंवा ‘या..र तुझा पत्ता कुठाय?’, ‘आवाज ही पहचान है!’ अशांसारखे साधे-सोपे विषय- त्या त्या गोष्टींमधले बारकावे टिपून आणि सखोल निरीक्षण करून कविता मेहेंदळे यांनी छान उलगडून दाखवले आहेत.
वाहणारा वारा, झरणारे झरे, उमलून येणारी फुलं, हे सारं अनुभवताना त्या रंग, गंध, सौन्दर्य लहरींकडे पाहण्याची आपली दृष्टी, यातूनच सौंदर्याच्या मुळाची ‘जाण’ येते. जाणिवा वयानुसार बदलत राहतात. वाढत्या वयानुसार दृष्टी अंधूक होत असली, तरी जाणिवा प्रगल्भ आणि स्पष्ट होत जातात.
केव्हा अन् कसे, आपण शब्दांच्या मुळाशी पोहोचलो उमगत नाही. शब्दांच्या अर्थामागे जाताना, प्रसंग, घटनांच्या कार्यकारणभावाचा मागोवा घेताना निर्माण झालेले लेख म्हणजे ‘मूलाधार!’ कोणत्याही गोष्टींच्या तळाशी जाऊन केलेल्या मूलभूत विचार म्हणजे कविता मेहेंदळे यांचं हे पुस्तक ‘मूलाधार!’
विचारांची जाण येऊ लागताच प्रत्येकाने मुळापासून वाचायला हवं असं हे लेखन- ‘मूलाधार!’’’
– सुधीर गाडगीळ
~~