फुलोरा
₹400.00
(Phulora)
ले. प्रतिमा कुलकर्णी
उत्तम ललितलेखनाचा ‘फुलोरा’
सुप्रसिद्ध लेखिका प्रतिमा कुलकर्णी ह्यांच्या ‘फुलोरा’ या ललित लेखसंग्रहामध्ये विषयांचं कमालीचं वैविध्य आहे. ओघवती शैली, कमालीची वाचनीयता या वैशिष्ट्यांसह प्रत्येक लेखामधून काही ना काही तरी वाचकाला शिकवून जाणं किंवा बोध देणं हे इथे इतक्या सहजगत्या होतं की मनोरंजनाबरोबरच वाचकाचं स्वतःचं चिंतन कधी सुरू होतं हेच वाचकाला समजत नाही. हेच या लेखनाचं यश आहे.
अगदी पहिल्याच ‘या सुखांनो या…’ लेखामध्ये लेखिकेने वाचकांना ‘सुखाची गुरुकिल्ली’ मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. संग्रहातील भारतीय सण, उत्सव, परंपरा यांविषयीच्या लेखांमध्ये लेखिकेने फार अभ्यासपूर्ण पण तितकाच मनोरंजक आढावा घेतलेला आहे.
‘कुणासाठी कुणीतरी..’ ‘वेळच्यावेळी आणि ठिकच्या ठिकाणी..!’ ‘वेळ द्यायला हवा..!’ ‘जगाबरोबर आपलं..!’ यासारखे लेख वाचायलाच हवेत असे आहेत. ‘संस्कार आणि संस्कृती’ यासारखे या पुस्तकातील अनेक लेख आजच्या तरुण पिढीने वाचायलाच हवेत असे आहेत.
एकूणच ‘फुलोरा’ हा प्रतिमा कुलकर्णी यांचा ललित लेखसंग्रह उत्तम ललितलेखनाचे आदर्श उदाहरण आहे.
– पराग रघुनाथ लोणकर
(प्रकाशक, लेखक व प्रमुख कार्यवाह- अ. भा. मराठी प्रकाशक संघ)




