शून्य-फुलीचा डाव
₹250.00
(Shoonya-phulicha daav)
कवयित्री- सुखमणि रॉय
सुखमणि रॉय या घाटकोपर, मुंबई येथील पी एन जोशी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग अध्यक्ष होत्या. त्यापूर्वी त्यांनी हिंदी अधिकारी पदावरही काही काळ काम केले. जाहिरात क्षेत्राशीही त्यांचा संपर्क होता. त्यांच्या संशोधन विचाराचे क्षेत्र स्त्रीवाद आणि उत्तराधुनिकतावादी असून त्यांनी मराठी व इंग्रजी मधून या विषयांशी संलग्न विपुल समीक्षालेखन केलेले आहे. त्यांच्या काही मराठी कथा, कविता निवडक नियतकालिकांतून अधून मधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. कमल देसाई या अग्रणी मराठी लेखिकेच्या ‘काळा सूर्य ‘आणि ‘हॅट घालणारी बाई’ या दोन कादंबऱ्यांचे सुखमणींनी केलेले इंग्रजी अनुवाद महत्त्वाच्या मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांतून समीक्षकांनी वाखाणललेले आहेत. मल्याळी लेखिका मानसी आणि मराठी लेखिका मेघना पेठे यांच्याही कथांचे त्यांनी इंग्रजी अनुवाद केले आहेत.
कबीरांच्या सर्व साखी, म्हणजे दोह्यांचे त्यांचे मराठी अनुवादांचे पुस्तक ‘साखी कबीर’ गाजलेले आहे. याखेरीज त्यांनी केलेले दोन आध्यात्मिक पुस्तकांचे हिंदीमध्ये अनुवाद आणि आणखी एका आध्यात्मिक पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद प्रकाशित झालेले आहेत.
विष्णु भटजी गोडसे यांच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘माझा प्रवास’ या पुस्तकाचे त्यांनी ‘ट्रॅव्हेल्स ऑफ एटीनफिफ्टीसेवन’ (Travails of 1857) या शीर्षकाने इंग्रजी अनुवाद व संपादन केले. त्यासाठी त्यांना एशियाटिक लायब्ररीमार्फत भारताच्या सांस्कृतिक विभागाचे अनुदान मिळाले होते. हे पुस्तक जगातील सर्व महत्त्वाच्या ग्रंथालयांमध्ये पोहोचले आहे.
त्यांचा हा कवितासंग्रह त्यांच्यातील काव्यप्रतिभेचे दर्शन घडवून आणतो.