श्री नीब करोरी बाबा महाराज (चरित्र, लीला व शिकवण)
₹300.00
(Shri Neeb Karori Baba Maharaj)
ले. संजय श्रीपाद देशपांडे
“महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर व इतर अनेक संतांचे कार्य संतसाहित्यातून उपलब्ध आहे. उत्तर प्रदेश/हिमाचल व उत्तराखंड ह्या भागातही खूप संत होऊन गेले परंतु त्यांची माहिती अतिशय मोजक्या व त्रोटक स्वरुपात मिळते.
देशी व विदेशी लोकांवर प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या ‘नीब करोरी बाबा’ या संतांचा व त्यांच्या कार्याचा परिचय हे पुस्तक करून देतं. बाबा हे प्रत्यक्ष हनुमान अवतार होते असे त्यांचे भक्त मानतात. नीब करोरी महाराज ह्यांचे कार्य हे समर्थ रामदास व श्री शंकर महाराज या दोन संतांच्या कार्याचे एक अद्भुत मिश्रण वाटते. त्यांनी १०८ हनुमान मंदिरे बांधली व अगणित लीला केल्या. त्यांचे अनेक ठिकाणी आश्रमही आहेत. भारताबरोबर अमेरिकेतही आज हजारोंच्या संख्येने त्यांचा शिष्य परिवार असून सत्संग/कीर्तनाद्वारे त्यांच्या कार्याचा प्रसार होत आहे.
*




