सावळी मधुबाला

230.00

(Sawali Madhubala)

मधुबालाचे केस बाबांकडे आहेत. मधुबालाचा क्लोन करावा का? मधुबालाचं सौंदर्य आणि अभिनय, या दोन्ही गोष्टी मला खूप खूप आवडतात. पण क्लोनिंग करताना मधुबालाच्या हृदयाच्या असाध्य आजाराचा DNA बदलला पाहिजे, म्हणजे ती दीर्घायुषी होईल…
(सावळी मधुबाला)

तीन दिवसांनी गण्याला परत बबडूच्या घरी आणलं. या तीन दिवसात त्या व्हिडिओमुळे माझी लाखो डॉलर्सची कमाई झाली. पण सगळ्यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे गण्या कोणत्या भाषेत बोलतोय हे कुणालाच समजत नव्हतं. तो कुणालाच ओळखत नव्हता. नासानं गण्याला अमेरिकेला घेऊन येण्याची विनंती केली. त्याच्या बरोबर तीन जणांचा संपूर्ण खर्च नासा करणार होतं…
(माचीवरला गण्या)

सगळ्यांचा निष्कर्ष एकच!
काही टन वजनाचं antimatterचं यान पृथ्वीवर पाठवलं असावं. अर्थात एलियन्सनी. पण हे यान पृथ्वीवर पाठवण्यात कोणता हेतू होता, हे समजणं महत्वाचं होतं….
(एकास एक मनाशी)

चार-पाच वर्षांनी सगळ्या गटांना आपण काय काय करत होतो, ते समजलं. एकांनी कालयंत्राची body तयार केली. एकांनी वेगवेगळ्या सर्किट्सची जोडणी केली. फिजिक्सच्या गटाने कालयंत्राला आवश्यक तेवढ्या उर्जा पुरवठ्याची निर्मिती केली. आवश्यक तिथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवले गेले. कालयंत्राच्या चाचणीचा दिवस ठरला. कोण ठरणार या कालयंत्राचा पहिला प्रवासी? त्याचं नाव जगात दुमदुमणार होतं…
(सर्वेश्वर)

उत्सुकतेपोटी मी दुर्बिणीतून पाहिलं. तेच दृश्य; फक्त मोठ्या आकारात दिसलं. एक-दोन आठवड्यात त्या कुटुंबानं माझ्या मनात घर केलं. सतत त्यांचाच विचार मनात घोळत होता. कोण असतील बरं ते तिघं? फक्त तिघंच! की, चौकोनी कुटुंब असून मला चौथा कोन दिसलाच नाही? सोफ्यावर फक्त तिघंच; ती महिला दोन पुरुषांच्या मध्ये बसलेली? पण घरात अशा जागा ठरलेल्या नसतात….
(अपेक्षाभंग)

“फक्त समोरच्याच व्यक्तीचे विचार `मनकवडा`ला समजतात. शेजारी शेजारी जास्त लोकं असतील, तर एकमेकांच्या मनातील विचारांचे शब्द एकमेकांत मिसळतील. अर्थपूर्ण वाक्य तयार होऊन शकणार नाही. या सॉकेटला प्रिंट जोडता येतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या विचारांचा प्रिंट आउटही घेता येतो…“
(मनकवडा)

मूळ किंमत ₹ २३०
सवलतीत फक्त ₹ १४० मध्ये!

आपण पुढील क्रमांकावर Gpayने पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. त्यानंतर कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर WhatsApp/sms करावा.

संपर्क/WhatsApp/Gpay : 9850962807

You may also like…