हन्गेरिअन विनोदकार जॉर्ज मिकेश

120.00

(Hangerian Vinodkar George Mikes)

इंग्रजांचा ह्युमर म्हणजे नर्मविनोद आपल्या परिचयाचा आहे. मिकेश हा अत्यंत प्रगल्भ बुद्धीचा विनोदी लेखक. मात्र काही कारणांमुळे मराठी वाचकाला त्याची व त्याच्या अतिसुंदर वास्तवाधारित लेखनाची, सूक्ष्म निरीक्षणशक्तीची व असामान्य प्रतिभेची चुणूक दाखवून देणाऱ्या विनोदाची फारशी ओळख नाही. ही उणीव श्री. करंदीकरांच्या या पुस्तकामुळे भरून येणार आहे.

मिकेश आपल्या विनोदाने इंग्रजी व फ्रेंच माणसांना चिमटे काढतो. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर, वागणुकीवर नेमके बोट ठेवतो. या पुस्तकात मिकेशच्या प्रतिभेचे सुयोग्य आरेखन करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
– अपर्णा मोहिले (सेन्सर बोर्डाच्या माजी अध्यक्षा.)

#############

हंगेरीत जन्मलेला हा लेखक युद्धजन्य परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी १९३८ साली इंग्लंडला आला आणि ब्रिटिश नागरिकत्व मिळवून तिथलाच झाला.

१९४६ साली त्याने लिहिलेले ‘हाऊ टू बी अॅन एलियन’ हे ब्रिटिश जीवनावरचे उपहासात्मक पुस्तक प्रचंड गाजले. त्याच्या पहिल्या काही आठवड्यातच तीन आणि नंतर तीसच्यावर आवृत्त्या निघाल्या. नंतर त्याने अनेक देशांवर पुस्तके लिहिली; तीही अशीच गाजली.

अनेक देशांची संस्कृती, इतिहास, सद्यपरिस्थिती यांचा सखोल अभ्यास, अल्पाक्षरी भाषा आणि नर्मविनोदात्मक शैली यामुळे मिकेशची सर्व पुस्तके प्रचंड लोकप्रियता मिळवून गेली.

अशा या लेखकाचा आणि त्याच्या लेखनाचा महाराष्ट्रातील वाचकांना परिचय करून देण्याचे महत्त्वाचे काम श्री. करंदीकर यांनी केले आहे.
– प्रकाशक

You may also like…