महापूजा अर्थात- महासती सावित्री

260.00

(mahapooja-arthat-mahasati-savitri)
ले. चुडाराम बल्हारपुरे
~
ही नाट्यरूप कथा आहे लोमेश ऋषींनी युधिष्ठिरास सांगितलेली महासती सावित्रीची कथा!
प्राचीन आणि चिरंतन जीवनमूल्यांचा परिचय आजच्या समाजाला करून देण्यासाठीचे हे नाट्यरूपांतर. आज आपल्या देवाधर्माला, प्रथा-परंपरांना नावे ठेवण्याचा प्रघात पडत असताना आपल्या पुराणकथांचे पावित्र्य टिकवून ठेवण्याचा, आपली संस्कृती जनमानसासमोर नाट्य प्रयोगांच्या रूपाने आणत राहण्याचा हा एक प्रयत्न. साधारण २००२ ते २०१० या कालावधीत ५१ कलावंत आणि १५ तंत्रज्ञांनी अपार मेहनत घेऊन साकार केलेल्या या महानाट्याचे प्रयोग झाडीपट्टीत खूप गाजले आहेत.
~~

महाभारतातील एका पौराणिक कथेच्या संकल्पनेवर लेखक व नाटककार श्री. चुडाराम बल्हारपुरे यांनी तीन अंकी संगीत नाटक लिहून खरोखरीच शिवधनुष्य पेलले आहे. वास्तविक सावित्री-सत्यवानाची कथा लोककथेसारखी वाहत आली आहे. एकनिष्ठा अन् सत्याचरणाच्या भक्कम पायावर बल्हारपुरे यांनी हे तीन अंकी सुरेख नाटक बेतले आहे.
लेखक चुडाराम यांना निसर्गाची, निसर्ग सौंदर्याची विशेष आवड आहे असं अनेक वर्णनांवरून स्पष्ट होतं. या वर्णनांत लेखक स्वतः रमतात आणि वाचकांनाही आनंद देतात. सावित्रीच्या इच्छेप्रमाणे- अशा निसर्गाच्या सहवासात सदैव राहण्याचा मोह आपल्याही मनाला झाल्याखेरीज राहत नाही.
लेखकाला नाट्यकथेच्या अनुषंगाने पद्यपंक्तीही नेमक्या सुचल्याहेत. श्रद्धा आणि भक्ती, हे लेखक चुडाराम यांचे स्वभावविशेष नाटकांत खुले प्रकटतात.
सृष्टी निर्माते ब्रह्मदेव, मृत्यूदाता यमदूत यांमधील विरोधाभास नाटक उंचीवर घेऊन जातो. तपोनिष्ठ सावित्री, वादळाला न जुमानणारी महासती, गायत्रीचा मंत्र जप करणारी वेदजननी, शपथ घालून पतीला मृत्यूपासून परावृत्त करणारी, यमराजाला विनवून पतीचे प्राण परत आणणारी महासती सावित्री- लेखकाने अतिशय सुरेख रेखाटली आहे. ही सावित्री- नक्कीच भुरळ पाडते.
– कविता मेहेंदळे

You may also like…