महाराष्ट्राचे चारधाम व इतर यात्रा…

280.00

(Maharashtrache Chardham)

ले. सुभा लोंढे

हिंदू धर्मात चारधाम यात्रेला फार महत्व आहे. ही यात्रा केली की आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान लाभते. सध्याच्या काळात विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या दळणवळणाच्या साधनांमुळे आता ही यात्रा करणे पूर्वीच्या तुलनेत सुलभ झाले आहे. परंतु तरीही आजही अशी काही मंडळी आहेत, की ज्यांना अनेक कारणांमुळे ही यात्रा करणे शक्य नसते. अशा मंडळींसाठी सहज शक्य होईल अशा अनोख्या चारधाम यात्रेचा लेखिका सुभा लोंढे येथे परिचय करून देत आहेत.

`संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे` ही महाराष्ट्रातील `चारधाम तीर्थक्षेत्रे` आहेत. ज्यांना चार वेद म्हटले जाते, ज्यांना प्रत्यक्ष महेश, विष्णू, ब्रह्मदेव व आदिशक्ती म्हणून संबोधले जाते, त्या चार अवतारी माहात्म्यांबद्दल जितकं जाणून घ्यावं तितकं थोडं आहे. खूप दूरचे चारधाम करणे ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या राज्यांतील या चारधामांचे दर्शन, या चारी भावंडांच्या समाधीस्थळांचे दर्शन घेऊन नतमस्तक व्हावे. या यात्रा करूनही चारधाम यात्रांइतकेच पुण्य पदरी पडेल अशी लेखिकेची अतिशय प्रामाणिक आणि अतिशय योग्य भावना आहे.

महाराष्ट्रातील या अनोख्या चारधाम यात्रेबरोबरच लेखिकेने केलेली तिरूपती बालाजी यात्रा, काशी विश्वेश्वर दर्शन व सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन यात्रा, व या यात्रा करीत असताना पाहिलेली अनेक तीर्थक्षेत्रे यांचे या पुस्तकातील वर्णन आपल्यालाही या यात्रा केल्याचा अनुभव देणारे…

Description

ले. सुभा लोंढे

You may also like…