उत्थान
₹360.00
(Uththan)
ले. किशोर कासारे
~
बुद्ध, धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयाने श्री. किशोर कासारे यांच्या या ‘उत्थान’ या लेखसंग्रहाचा बहुतेक अवकाश व्यापलेला आहे. लेखकानं अतिशय गाढ्या अभ्यासातून आणि सखोल चिंतनातून शब्दबद्ध केलेलं हे लेखन आहे. लेखकाची तळमळ येथे अगदी स्पष्ट लक्षात येते.
श्री. कासारे कोणत्याही एका जात, धर्म किंवा समाजातील माणसांचा येथे विचार करत नाहीत. ते कुणा एकाची स्तुती आणि कुणा एकाची निंदा असा पक्षपाती व्यवहार करत नाहीत, हे मला अतिशय भावलं. जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन ‘आपण सारे भारताचे लोक आहोत’ ही भावना, इतकीच ओळख आपल्या प्रत्येकाच्या मनात दृढ व्हायला हवी हा श्री. कासारे यांचा विचार, आग्रह फार महत्वाचा आहे. वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा, त्यांच्या कार्याचा व श्रेष्ठत्वाचा या पुस्तकामध्ये फार सुंदर परिचय विविध लेखांमध्ये आपल्याला होतो. समाजाला एक करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्याची गरज येथे आपल्या लक्षात येते. संपूर्ण पुस्तकात अनेक प्रश्नांची, समस्यांची उत्तम कारणमीमांसा करण्यात आली असून विशेष म्हणजे त्यावर लेखकाने उत्तरंही सुचवली आहेत, अगदी सहज स्वीकारता येतील असे मार्गही दाखवले आहेत. हे पुस्तक म्हणजे एका अभ्यासू, संशोधक वृत्तीच्या, अनेक विषयांवर प्रभुत्व असलेल्या एका मित्राशी आपण केलेला संवाद वाटतो. श्री. किशोर कासारे यांचा हा ‘उत्थान’ हा लेखसंग्रह हे उत्तम वैचारिक लेखनाचं आदर्श उदाहरण आहे.
– पराग रघुनाथ लोणकर




