एक अध्याय
₹400.00
(Ek Adhyay)
(कथासंग्रह)
ले. अनिल पांढारकर
गेली अनेक वर्षे अनेक कथाकार लिहीत असलेल्या कथालेखनामुळे मराठी कथाविश्व समृद्ध झालेले आहे. आजही असे अनेक लेखक आहेत की जे आपापल्या परीने आपली वेगळी वाट शोधून कथालेखन करीत आहेत. श्री. अनिल पांढारकर हे त्यापैकीच एक नाव. त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथेतील पात्रे स्वतःशी; तसेच समोरच्याशी साधत असलेला संवाद! समोरच्याशी संवाद साधत असतानाच त्यांचं पात्र स्वतःशी संवाद साधतं आणि एखाद्या घटनेबाबत स्वतःचं एक मत व्यक्त करताना त्याचवेळी दुसऱ्याचं काय मत झालं असावं याचाही विचार करतं. अनिलजींच्या कथांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनातील आटोपशीरपणा. त्यांचं लेखन थोडक्या शब्दात, थोडक्या वाक्यांत पुढे जातं. अनिलजींच्या बारा निवडक कथांचा हा संग्रह.
Categories: stories, प्रकाशित पुस्तके




