Description
यतीन सामंत
₹250.00
आपण 9850962807 या क्रमांकावर Gpayनेही पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. अश्या पद्धतीने सवलतमूल्य जमा केल्यास कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर whatsapp/sms करावा.
(Kaleidoscope)
प्रस्तुत पुस्तकात आपल्याला विषयवैविध्याचा- विनोदी ते वैचारिक ते व्यवस्थापकीय असा एक भला मोठा पल्ला कह्यात घेतलेला दिसतो. कथा, लेख, लघुनिबंध, विनोदी, वैचारिक, व्यवस्थापकीय लेख, स्फुट लिखाण असा विविध टवटवीत फुलांचा हा एक लक्षवेधी ताटवा किंवा गुच्छ आहे. विषयांचे वैविध्य असले तरी या संग्रहाला स्वत:ची एक लय आहे, ताल आहे आणि वैविध्यात जपलेली सुसूत्रता आहे…
लेखकास आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांवर त्यानं केलेल्या लेखनाच्या या जादुई पोतडीत आपल्याला हलका फुलका निष्कपट विनोद, गंभीर वैचारिक लेखन, काव्यगुण, सामाजिकता असे अनेक पैलू आढळून येतात. शैलीतील सहजता आणि ओघ यात आपण रंगून जातो. व्यवस्थापनावरील लेखांचा भागही विशेष उल्लेख करण्यासारखा. इंजिनीअरिंग आणि एमबीएची पदवी आणि प्रत्यक्ष काम करताना आलेले अनुभव याची उत्तम सांगड घालून लिहिलेल्या या लेखांचा तरुण वाचकांना नक्कीच फायदा होईल.
~
यतीन सामंत