आचरणशास्त्राचे महागुरू – संत वाङमय

200.00

(Acharanshastrache mahaguru sant vangmay)

ले. विलास गावडे
~
श्री. विलास गावडे म्हणजे एक मान्यवर विचारवंत लेखक, हळव्या मनाचे कवी व प्राचीन संतवाङ्मयाचे अभ्यासक.

व्यवस्थापनशास्त्र, त्यातही कार्मिक व्यवस्थापन आज आपण पाश्चात्यांकडून शिकत आहोत; परंतु हा सर्व ठेवा आपलाच आहे. आणि हेच ठासून सांगण्याचा व पुराव्यांसह सिद्ध करण्याचा श्री. गावडे यांचा उपक्रम या पुस्तकाचे स्वरूप घेऊन केला गेला आहे.

पाश्चिमात्य तत्ववेत्यांनी म्हणजे अब्राहम मास्लो ते डॅनियल गोलमन किंवा अरिस्टॉटलपासून स्टीफन कोव्हेपर्यंत सांगितलेली तत्वे ही आपल्या संत संतवाङ्मयात वर्णन केलेली आहेत. या पुस्तकात संत एकनाथ, संत रामदास, संत तुकाराम, संत कबीरदास यांच्या संतवाङ्मयाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याची श्री. गावडे यांची हातोटी लक्षात येते. संतांनी वर्णिलेले त्यांचे विचार व त्यांची तत्वे आजही सुसंगत आहेत आणि उद्याही ती सुसंगत राहणार आहेत हे श्री. विलास गावडे यांनी ह्या लेखांद्वारे स्पष्ट केले आहे.

You may also like…